सगळ्यांच्या आयुष्यात एक वळण अस येतं ...... अन् सगळं काही बदलतं ..... अन् हे घडतं तेव्हा आपण आपले राहतचं नसतो ...... आपल्या आयुष्यात चोरपावलांनी .... कुठून येते ती व्यक्ती अचानक ..... कशी ? ..... व का भेटते ? ती व्यक्ती आपल्याला ? .... एक अनोळखी वळण ...... जिथे आपल्या पावलांना मिळते .... दुसऱ्या दोन पावलांची साथ .... अन् सुरु होतो एक मर्यादित प्रवास .... येथुन जगणं नव्याने सुरु होतं .... त्या व्यक्तीशिवाय आयुष्य जगणं .... ही कल्पना देखील नकोशी वाटते .... येथुनच प्रत्येक भावनेला अर्थ .... प्रत्येक हाकेला साद .... दुःखाला सांत्वन मिळत .... काट्यांवरुन चालतांना देखील .... फुलांच्या संवेदना जाणवतात .... त्या व्यक्तीच्या केवळ स्मरणाने .... हृदयाची स्पंदनं वाढतात .... त्या व्यक्तीचा स्पर्श देखील .... पहाटेच्या गारव्या इतका धुंद वाटतो .... एक अनोळखी ओळख असते ही .... कितीही नाही म्हटलं .... तरीही हवी - हवीशी वाटणारी ...... ! अन् अनोळखी ओळख म्हणजेच " प्रेम " ... !!!
0 likes
0 shares