Back to feed
S
Sara Rao Love · Marathi · Romantic

सजविला देव बुडविला देव केली उठाठेव धनबळे || ओरड आरत्या वाजविल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा || भाकड भावाचा आळविला सूर दान भरपूर गोळा केले || कुठल्या गणाचा देवा तू रे पती सोंग हे नाचती बुणग्यांची || विक्रांत एकटा कोंडला घरात गुलाल दारात खच पडे ||

194 likes 15 shares
WhatsApp