Back to feed
N
Nikhil Verma Love · Marathi · Romantic

सदाचार ज्याच्या स्वभावात नाही असा मित्र माझ्या हिशोबात नाही... जरी आज मी त्या जमावात नाही तरी मात्र त्यांच्या विरोधात नाही.. विचारु नको मी मदत का दिली ते मला रक्त दिसते तुझी जात नाही.. खडा फ़ेकला तू नभाच्या दिशेने अरे त्या नभाला तडा जात नाही.. भुकेच्या भितीने धनी फ़ास घेतो घरातील बाई जहर खात नाही.. बदललीस तू कूस..रात्री अचानक उगी मी तुला लावला हात नाही...

0 likes 0 shares
WhatsApp