Back to feed
A
Atharv Iyer Love · Marathi · Romantic

सुंदर काय असतं ??? मला वाटतं... जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं... ते मन सुंदर...!! मला वाटतं... चांगल्या चेहर्याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात... ते विचार सुंदर...!! मला वाटतं... कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते... ते नाते सुंदर...! मला वाटतं... ज्यामध्ये एकमेकांची आठवण काढल्याशिवाय जगू शकत नाहीत... ते मनापासून असलेलं प्रेम सुंदर...!! मला वाटतं... कुठल्याही अपेक्षेशिवाय एकमेकांना दिलेली कायमची साथ... एकजीव असल्याची जाणीव असते... ती साथ आणि जाणीव सुंदर...!! मला वाटतं... जिथे आपलं मन विश्वासतं... जिथे आपलं मन जपलं जातं... असा मिळवलेला विश्वास आणि आपल्या मनाला जपणारं कोंदण सुंदर...! 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp