सुंदर काही तरी लिहायच आहे तुझ्या आठवनीत अडकायच आहे तु नाही भेटली मग काय झाल तुझ्या कवितांत रमायच आहे. सुंदर काही तरी बघायच आहे बघुन तुला, चंद्राला विसरायच आहे चांदनीला ,तुझ्या स्वप्नासाठी तोडायच आहे तुझ्या स्वप्नांसाठी जगायच आहे. सुंदर विश्व बनवायच आहे छोट घरकुल बनवायच आहे तुझ्या माझ्या संसारात रमायच आहे सर्व जगाला विसरायच आहे. सुंदर स्वप्न बघायच आहे स्वप्नात तुला भेटायच आहे माझ प्रेम तुला सांगायच आहे स्वप्न तुटण्या अगोदर उठायच आहे. सुंदर कविता लिहायची आहे माझ प्रेम त्यात लिहायच आहे कविता तुला द्यायची आहे तुला माझ करायच आहे. ❤💝💝💝💝💝💝💝💝😍
0 likes
0 shares