Back to feed
R
Riya Agarwal Love · Marathi · Life

साधेच बोललो काही, तुज "राधे" ऐकु गेले जांभळी जाहली सिता, अन नवी वल्कले ल्याली .. मोहाच्या वाटा काही, काट्याच्या वाटा काही, पाऊल उचलते सिता, लंकेच्या वाटेवरती .. सितेची होई राधा, लंकेची मथुरा झाली, अन मनात झाला गुंता, क्षण ठीसूळ होता तोही.. सितेतील राधा बोले, मज राम हवा ना अनय, ना हवा सावळा कृष्ण, जो सदैव वसे, मज ह्रदयी.. मज गूढ उकलले काही, अंतरात सलले काही, तुज काय हवे गे नक्की? मी पुन:श्च पुसले नाही...

0 likes 0 shares
WhatsApp