Back to feed
K
Kiara Joshi Love · Marathi · Life

सोप नसत बायको बनून कुणाच्यातरी आयुष्यात जाणे. बालपणातील आठवणींना स्वतःच्या हाताने लोटून देणे. नवर्‍याला उशिर होतो तेव्हा जीवाचं कातर होणे. स्वयंपाक घर ते दार सारखं-सारखं डोकावून पाहणे. मनातल्या वाईट घेऊन देवघरात धावत जाणे. नवरा दारात दिसताच जीवात जीव येणे. आईच्या मायेन चेहर्‍यावरचे भाव ओळखून घेणे. अन् तो जेवल्यावर आपणच तृप्तीचा ढेकर देणे. सोप नसते बायको असुन नवर्‍याची आई होणे. सोप नसते ठेच लागेल तेव्हा त्याला साथ देणे. त्याची सारी संकट स्वतःहून अंगावर घेणे. पटो न पटो त्याच गणगोत आपलं करून घेणे. त्याच्या जबाबदार्‍या आपणहून आपल्या शिरी घेणे. सोप नसत बायको असून बहिणीच्या मायेन समजून घेणे सोप नसत हसत खेळत प्रत्येक आडचणींना सामोर जाणे मागच सोडून पुढे चांगल घडेल याची वाट पाहणे. आपला धीर सुटत असताना त्याला मात्र धीर देणे. सोप नसत बायको असून मैत्रिच्या नात्यान समजून घेणे. सोप नसते आपला त्रास विसरून अखंड त्याला बळ देणे. एवढ करून सुध्दा आपण नाममात्र राहणे. त्याला राजेपद देऊन त्याची पट्टराणी कम दासी होणे...!

0 likes 0 shares
WhatsApp