Back to feed
V
Vihaan Singh Spiritual · Marathi · Spiritual

सप्तशृंग गडावरी देवी प्रकटली भूवरी साडेतीन पीठातील अर्धपीठ हे अवनीवरी महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मक शक्ती एकवटली स्वयंभू सप्तशृंगी माता ॐकार रुपी सतशृंगी गडावरी अवतरली अती भव्य स्वरुप देवीचे अठराभुजाधारिणी अस्त्र शस्त्र करी शेंदूरचर्चित रुप जगदंबेचे मळवट भाळावरी मुकुट माथ्यावरी उंच पर्वतरांगात स्थान हिचे भक्त दर्शनासी येती नवसाला पावते ऐसी सप्तशृंगी मातेची महती घराण्याची कुलस्वामिनी आदिमाता जगज्जननी भक्त संकटी पडता सत्वर येई ती धावूनी मार्कंडेय ऋषी सांगती पुराण देवी ऐकता ध्यान देऊनी एक हस्त कानावरी ठेवूनी अखिल भक्तांची कुलस्वामिनी श्रध्दाभावे करिता भक्ती माता हरण करिते संकटासी प्राची नमन करिते मातेसी दे आशिष गे मजसी

140 likes 40 shares
WhatsApp