Back to feed
R
Rohan Agarwal Motivation · Marathi · Motivation

⭐ _*साप्ताहिक राशीभविष्य; 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2019* ▪ _*मेष*_ : खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने प्रथमपासूनच अनावश्यक खर्चावर योग्य नियंत्रण ठेवणेच आवश्यक राहणार आहे. प्रवासात सावधानता बाळगा. कामाचे योग्य नियोजन करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ▪ _*वृषभ*_ : नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. विवाहइच्छुकांच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण होतील. ▪ _*मिथुन*_ : महत्त्वाचे कागदपत्रे व आर्थिक बाबतीतील व्यवहार चोखंदळपणे करावे लागतील. नवे व्यवहार करताना कायदेशीर सल्ला घेणे योग्य राहील. नव्या समस्या टाळण्यासाठी त्या गोष्टींचा सखोल विचार करून निर्णय घ्यावे लागतील. ▪ _*कर्क*_ : आपल्या अनुभवाचा व शिक्षणाचा योग्य फायदा करून घेता येईल. कला, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रांत आपण आघाडीवर राहू शकाल. येणाऱ्या काळाचे योग्य नियोजन करण्याचा आपला मानस राहील. ▪ _*सिंह*_ : आर्थिक बाबतीतील महत्त्वाचे निर्णय सध्या लांबणीवर टाकणेच योग्य राहील. सार्वजनिक कार्यात आपले नाव खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. ▪ _*कन्या*_ : वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. नातलगांशी सामंजस्याने वागणेच हितकारक ठरणार आहे. प्रकृतीस्वास्थ्याबाबत अधिक दक्षता घ्या. आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष द्या. कोणालाही जामीन राहू नका. ▪ _*तूळ*_ : कुटुंबियांसोबत आपण अधिक वेळ घालवू शकाल. आपल्या आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे. मित्र व नातलगांबाबत एखादी योजना आखू शकता. प्रवास कराल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराची मदत मिळेल. ▪ _*वृश्चिक*_ : आपण धैर्याने व हुशारीने आपली बाजू मांडून आपली कामे यशस्वी करू शकाल. आपण कोणत्याही दबावाखाली कामे करणे टाळा. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. राजकारण व क्रीडा क्षेत्रात यश मिळविता येणे शक्य आहे. ▪ _*धनू*_ : आपल्या श्रमाच्या मानाने आपणास म्हणावा तसा लाभ होत नाही, पण विचलित न होता आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. आपल्या नात्याविषयी आपण सावध राहावे. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. प्रवासाचे योग संभवतात. ▪ _*मकर*_ : आपल्या मेहनतीला आपण प्राधान्य द्या. कामाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे पण त्याचा आपण योग्य तऱ्हेने निपटारा करू शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. कायदा व नियमांचे पालन करा. ▪ _*कुंभ*_ : आपल्याला मनातील स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने पावले टाकता येतील. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात एखादे पद मिळण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींची नाराजी दूर करू शकाल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत आपण अधिक दक्ष राहावे. ▪ _*मीन*_ : आपल्या अहंकारावर योग्य नियंत्रण ठेवणे हितकारक राहणार आहे. नात्यात चढ-उताराशी सामना करावा लागणार आहे. राशिस्थानीचा मंगळ आपणास कामाचा उत्साह देऊ शकेल. आरोग्याबाबत चालढकलपणा करू नका.

153 likes 34 shares
WhatsApp