Back to feed
R
Rudra Iyer Love · Marathi · Romantic

सोबत तुझ्या, जगणार आहे मी, देवाकडे तुलाच, मागणार आहे मी..... * सुखात तुझ्या, हसणार आहे मी, दुःखात तुझ्या, रडणार आहे मी..... * डोळ्यात तुझ्या, दिसणार आहे मी, श्वासात तुझ्या, अडकणार आहे मी..... * ओठावर तुझ्या ओठ, टेकवणार आहे मी, मिठीत तुझ्या, हरवणार आहे मी..... * मनात तुझ्या, उरणार आहे मी, ह्रदयात तुझ्या, राहणार आहे मी..... * स्वप्नात तुझ्या, येणार आहे मी, दुराव्यात तुला खुप, छळणार आहे मी..... * विसरणार नाही , कधीच मी तुला, तुझी साथ कधीच, सोडणार नाही मी..... * * तुझी साथ कधीच, सोडणार नाही मी...

0 likes 0 shares
WhatsApp