Back to feed
V
Vivaan Bhat Love · Marathi · Romantic

समोर असताना मी सारं काही विसरावं.. तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं .. ♥♥ तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं.. कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं.. ♥♥ तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं.. सोबत तिच्या हरवूनच जावं .. ♥♥ तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं.. अदांवर तिच्या कोणीही फिदा व्हाव ... ♥♥ तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं.. अश्रूंनी तिच्या कोणालाही वाईट वाटावं.. तिचं हसणं कोणालाही सुखवावं.. गालावरल्या खळीत तिच्या कोणीही घसरून पडावं.. ♥♥ तिच्या नजरेने मलाच शोधावं.. अचानक नजरेने नजरेला भिडावं .. मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं.. ♥♥ तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं.. साथ देऊ जन्मोजन्मी .. विरहाचं दुख कधीही न यावं.. कधीही न अनुभवावं..♥♥

0 likes 0 shares
WhatsApp