Back to feed
K
Krishna Reddy Love · Marathi · Romantic

सांर विश्व माझं घर माझा गोतावळा मोठा प्रेम-माया आपुलकी नाही आनंदाला तोटा, माझी आई वसुंधरा सुर्यदेव माझा पिता चांद भाऊराया माझा बहीण सरीता, माझी लेकरं भोवती पशू, पक्षी,वृक्ष वेली, चारा पाणी घालून ती जीवापाड मी जपली नातं याशी काय सांगू ज्यांची मायाच आटली मेल्या मायेची माणसं नाती रक्ताची गाठली, पण बनते विशाल जेव्ह संकुचित दृष्टी जीवा-भावाच्या नात्यांचा देते साक्षात्कार सृष्टी

0 likes 0 shares
WhatsApp