Back to feed
S
Saanvi Gupta Love · Marathi · Romantic

सारखं सारखं तुला msg करून अगदी भंडावून सोडणं , सकाळ संध्याकाळ तेच तेच msg Good morning अन् good night चे , आजारी असलीस की मग विचारपूस गोळ्या व तब्येतीची, तुझा पहिला दुसरा नंबर आला की केलेलं अभिनंदन अगदी गर्वाने, तुला कंटाळा आला की मग बोलत बसणं तासंतास काहीही उगाचच, मी सांगितलेले माझे कमी मार्क त्यावर तुझी ती त्रस्त प्रतिक्रिया, तुझ्या birthday gift चं planing अन् तू त्याचा केलेला अस्वीकार ,माझ्या प्रेमासारखाच, . . . या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच कदाचित मला, भूतकाळात जगायला आवडतं अगदी तासंतास तू माझ्या जीवनात असताना जगण्यात एक वेगळीच मजा होती अर्थातच आता सुध्दा आहे पण आता ती शोधावी लागते "एक मुलगी माझं जीवन नाही बदलू शकत" हा खोटा ego prove करण्यासाठी मग कधी कधी वाटू लागतं मी शोधतोय ते entertainment आहे खरी मजा तर तु होतीस तेव्हाच यायची . . . . या सर्वात मग परत कधी कधी वाटु लागतं मागावी तुझी माफी , का ? ते माहीत नाही पण मागावी...... मिळवावी तुझी मैत्री पुन्हा , अपेक्षा सोडून प्रेमाची, जी या आधीही कधीच नव्हती, बोलत बसावं पुन्हा एकदा तासंतास , अन् खूप काही करावं ,फक्त तुझ्यासाठी... पण ...... बोचऱ्या शब्दांनी बांधला गेलेलो मी, तुझ्या सुखासाठी प्रार्थना करत तुझ्या परतण्याची वाट पाहणं , त्याच मैत्रीच्या वाटेवर जिथं मला एकटंच सोडून गेलीस, एवढंच करू शकतो ....

0 likes 0 shares
WhatsApp