सळसळ पानांची सुखावणारी चाहूल तुझी देऊन गेली वारा तुझा दूत झाला त्यानेही सुखद शीळ दिली धुंद धुंद आसमंताला मृदगंधाने साथ दिली पशुपक्ष्यांच्या आनंदाला मयूराने गूज दिली झाड झाड आनंदलेलं ढगांची जेव्हा दाटी झाली फुल फुल सुखावलेलं निसर्गाची आज शोभा झाली सगळी सगळी धरा आज तुझ्याच स्वागता सजलेली आतुरतेचं गुपित तुझ्याही अबोली मला बोललेली वाट तुझी पाहातच घटका सुखे टळलेली शेवटी आलीस तू तृप्तता मी मिळविली शब्दच सुचत नव्हते शांतताच बोललेली न बोलताच बोलायची कला तुला जमलेली शांततेच्या संगीताला पावसाने साथ दिली क्षण आपला सजवण्या कळी कळी खुललेली धीरानेच मी प्रश्न टाकला चर्या तुझी बावरलेली रोमारोमाची माझ्या शुद्ध आता हरपली नजर एक चोरटी मी तुझ्याकडे टाकलेली दिसलीस मला तिथे तू जरा लाजलेली वृंदावनी राधा जशी कृष्णासाठी बुजलेली चराचराने तिथे मला संमती तुझी कळवलेली पावसासवे आनंदगाणी वाऱ्यानेही गायलेली जिंकूनही सारे हारण्याची अवस्था मी पाहिलेली असरदार या क्षणी तुला ही काव्यमाला वाहिलेली!!
0 likes
0 shares