स्वप्नी माझ्या येऊन तू फक्त गप्पा मारत बसतेस तर कधी मिठीत येऊन अचानक निरोप घेऊन जातेस गप्प राहा ग आता किती बडबड करतेस … सुख – दु:ख वाटताना माझ्यावर का तू रुसतेस? दिसलो नाही एकदा जरी अबोला माझ्याशी धरतेस आयुष्याची गणितं मांडताना मैत्री मात्र विसरतेस …!!! माझ्याविना तू , तुझ्याविना मी कधी ना राहू शकलो तरीही या गोंडस नात्याला प्रेम नाही म्हणू शकलो !! बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र नयनी दोघांच्या अश्रू तरळले भाव नजरेतील सावरताना लोकांनीही पहिले … मैत्री कि प्रेम म्हणावे कधीच नाही कोणा कळले नाते तुझे-माझे .. असे कसे हे जगावेगळे … !!! 💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares