Back to feed
A
Aadhya Deshmukh Love · Marathi · Life

*****स्वप्नातली प्रेयसी माझी***** तो : माझ्यात काय आवडतं ??? ती : तुझ स्वतःच अस काहीच नाही आवडत मला. तो : किती प्रेम करतेस माझ्यावर ??? ती : हे माझ्या हतातल हिरवे पान दिसतयं? त्या पानावरच्या जितक्या हिरव्या शिरा आहेत ना तितकचं प्रेम करते जास्त नाही.. तो : मला कधी विसरशील??? ती : एकदम सहज विसरेन्.... हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला की विसरेन तुला.. तो : कधी आठवशील मला ??? ती : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरिच काढ़ेन.....पापण्यांची उघड़झप होईल ना तेव्हाच काढ़ेन.... तो : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का ??? ती : तोटा तर आहेच...... माझ्या सोबत राहिलास तर तुला तुझ दुःख एकटयाला अनुभवता येणार नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल...... तो : माझ्या कोणत्या गोष्टीवर तुझा सर्वात जास्त हक्क आहे??? ती : तुझ्या जगण्यावर नसेल माझा हक्क पण.. तू माझ्याशिवाय एकटा हे जग सोडून जाऊ शकत नाही.... सगळ सांगताना तिच्या डोळ्यात फ़क्त पाणीचं होतं. तो काय क्षण होता तो क्षण शिंपल्यातल्या मोत्यासरखा होता मनात भरनारा.....

0 likes 0 shares
WhatsApp