Back to feed
I
Ira Joshi Love · Marathi · Romantic

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी **************************************** आई" म्हणोनी कोणी, आईस हाक मारी ती हाक येई कानी, मज होय शोककारी नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी ? आई घरी न दारी चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई येशील तू घराला परतून केधवा गे ? रुसणार मी न आता जरी बोलशील रागे "आई" कुणा म्हणू मी, आई घरी न दारी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

195 likes 68 shares
WhatsApp