सवय स्वप्न वेचण्याची तुला हसता बघण्याची गोजिरवाणं रूप तुझं बघून हौस जगण्याची चांदणे तुझ्या टिकलीत वाऱ्यासवे केस लहरे नयनी काजळ शोभतो वेडे झाले मन बावरे ऐकून हृदयाचा ठोका आवाज देतोय सारखा सामावून तुझ्या हृदयी आपले म्हण तू एकदा फार काही मी न मागता हर्ष मागतो संगतीचा ये प्रिये मज सोबतीने घेऊन होकार तू आता
0 likes
0 shares