Back to feed
A
Aditya Kulkarni Love · Marathi · Romantic

संस्कारांची घेऊन शिदोरी एकेक घास तान्हयाला भरवला खेळ खेळले हजार बिलोरी हळूच एकेक अर्थही शिकवला विद्येचे असे हे शस्त्र दुधारी उपयोग त्याचा करण्या समजावला वित्ता हाती नको होऊ मदारी पुण्य कमव तू तुझ्या पदराला कलेचे तर बळ असे कट्यारी वापर त्याचा असे समाधानाला आपण असलो जरी एक हजारी याचा वापर अव्वल होण्याला ओंजळीत भरले संस्कार सोनेरी तुही दे बाळा आता पुढाच्याला

0 likes 0 shares
WhatsApp