Back to feed
R
Rohan Agarwal Love · Marathi · Romantic

सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आई ने दिलेला कानमंत्र.........असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा....हीच बदलत्या काळाची गरज आहे.... ✍आई झाल्यावर , मुली तुला आईपणाचे भान येऊ दे एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे✍ ✍मतलबी जाळ्यात नवरा फसवून अलिप्त संसार थाटू नको स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको✍ ✍सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको ✍ ✍सासऱ्याच्या म्हातारपणावर रागेवैतागे घसरू नको नव्या-जुन्या पिढीमधील दुवा तुच आहे , विसरू नको ✍ ✍अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल पण तुझ्या लाडक्यांना खेळणीही तोच काका घेऊन येईल✍ ✍लहान असो नाहीतर मोठी नणंद तर चेष्टेने त्रास देणारच मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिऊ काऊचा घास भरवणारच✍ ✍तुझं-माझं भेदभावनेने जावेच्या पोरांचा द्वेष करू नको वेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍ ✍घरातल्या क्षुल्लक कुरबुरिंना द्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील ? अग, जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घरपण मारशील ✍ ✍नातेवाईकांना धरुन राहिली तर सर्वांच्या मनात घर करुन रहाशील तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात पहाशील✍ ✍शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत..... सर्व आई ,ताई मैत्रिणींना आणि सर्व महिलांना समर्पित ..... सर्वांनी जास्तीत-जास्त शेअर करा ...

134 likes 83 shares
WhatsApp