Back to feed
J
Jiya Reddy Love · Marathi · Romantic

सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आई ने दिलेला कानमंत्र.......🌹..असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा....हीच बदलत्या काळाची गरज आहे....👍 ✍🏻आई झाल्यावर , मुली तुला आईपणाचे भान येऊ दे एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे✍🏻 ✍🏻मतलबी जाळ्यात नवरा फसवून अलिप्त संसार थाटू नको स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको✍🏻 ✍🏻सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको ✍🏻 ✍🏻सासऱ्याच्या म्हातारपणावर रागेवैतागे घसरू नको नव्या-जुन्या पिढीमधील दुवा तुच आहे , विसरू नको ✍🏻 ✍🏻अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल पण तुझ्या लाडक्याना खेळणीही तोच काका घेऊन येईल✍🏻 ✍🏻लहान असो नाहीतर मोठी नणंद तर चेष्टेने त्रास देणारच मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिऊ काऊचा घास भरवणारच✍🏻 ✍🏻तुझं-माझं भेदभावनेने जावेच्या पोरांचा द्वेष करू नको वेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍🏻 ✍🏻घरातल्या क्षुल्लक कुरबुरिंना द्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील ? अग, जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घरपण मारशील ✍🏻 ✍🏻नातेवाईकाना धरुन राहिली तर सर्वांच्या मनात घर करुन रहाशील तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वाबरोबर आनंदात पहाशील✍🏻 ✍🏻शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत..... सर्व आई ,ताई मैत्रिणींना आणि सर्व महिलांना समर्पित .....

247 likes 22 shares
WhatsApp