संसाराचं कोडं संसाराच्या नावाखाली दोन वेगवेगळी माणसं एकाच घरात राहायला सुरुवात करतात. "ती एकत्र आहेत" असं नाही म्हणता येत. दोन वेगेवेगळी मनं. दोघांचे विचार वेगवेगळे .मतं वेगवेगळी. आवडी निवडी वेगळ्या. होमकुंडासमोर हार घातल्या घातल्या स्वत:ला समोरच्याच्या हवाली करायचं, लहानपणा पासूनच्या सगळ्या सवयी एका क्षणात परक्या करायच्या. त्याग, समजूतदारपणा हे सगळं मोठं मोठं क्षणात समजून घ्यायचं. इतकं सोप्पं असतं का हे सगळं ? पण करणं भाग असतं. "संसार" हा विस्कटलेल्या पसाऱ्यासारखा असतो. थोडं देऊन थोडं घेऊन सगळं गोळा करावं लागतं. हरवलेलं शोधावं लागतं आणि लपवलेलं मिळवावं लागतं. समोरचा नेहमीच चुकीचा कसा असू शकेल? संसारासाठी मनं शांत हवी. समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची हिंमत हवी, धीर हवा. भांडायला बहुतेक सगळ्यांना जमतं, मांडायला नाही जमत. भांडलं कि तुटतं अन् मांडलं कि एकजुटतं.
0 likes
0 shares