सोसल्या ज्या विरहाच्या यातना, तू ही थोड्या अनुभवशील का ? . मलम लावण्या त्या जखमांना, मिठीत मला थोडं घेशील का ? . भिजलेले किती रात्र-दिवस ते तू ही आठवणींत थोडं रडशील का ? . पुसून आसवे माझ्या डोळ्यांतील मिठीत मला थोडं घेशील का . . आठवणींतले सुंदर क्षण ते, तू ही थोडं त्यात रमशील का ? . देऊन कबुली प्रेमाची स्वताच्या मिठीत तुझ्या अलगद घेशील का ?
0 likes
0 shares