सहजच कधी, एक नजर टाकून बघ.. : इवल्याशा हृदयाची माझ्या, ही साद ऐकून बघ.. : सहजच कधी, थोडसं मनातलं बोलून बघ.. : शब्दांपलीकडे मला, कधी ओळखून बघ.. : सहजच कधी, जगाला विसरून बघ.. : थरथरता हात तुझा, माझ्या हाती देऊन बघ.. : सहजच कधी, शब्दांशिवाय बोलून बघ.. : नसेलच जमत तुला, तर हलकेच लाजून बघ.. : सहजच कधी, तुझं काळीज ऐकून बघ.. : तुला ऐकू येणारा आवाज, माझ्याच काळजाचा असेल बघ... 💘💘💘💘💘💘💘💘💗💗💗💗💗💗💗💗
0 likes
0 shares