Back to feed
K
Krishna Gupta Love · Marathi · Romantic

हा असा केला गडे मी काय गुन्हा? लेखणीला लाविला मी हात पुन्हा! कोणता हा रंग तुझा रे निसर्गा? बाग सारी करपून गेली रे उन्हा! रस्ते होतेच सारे परिचयाचे तरीही, जागजागी कोणत्या या दिसती खुणा? हाय मी विसरून गेलो सारे तरीही, हे असे डोळे तुझे करिती पुन्हा खाणाखुणा।। पंख होते छाटलेले तरीही, उंच आकाशी घेतली मी भरारी पुन्हा।। चंद्र होता मावळून गेला कधीचा! तरीही दिसती चांदण्यांचे रंग कुणा ।। भेटले किती प्रवासी नवे मला तरी, आवडे का मज तव संग जुना ।। रे इथे राहती ना माणसे ? रस्ता कसा मग हा एवढा निस्संग सुना!!!

60 likes 15 shares
WhatsApp