हा कोणत्या प्रकारे करतो प्रचार बाबा ना माणसास शोभे ऐसा अचार बाबा या चालवून गोळ्या स्मरतोस काय देवा तस्बीह ओढताना करना विचार बाबा करतो जिहाद ऐसा ठेवून प्राण ओलिस ही चालते कृती का, देवा विचार बाबा हिंसा करून केंव्हा लाभे कुणास शांती नाही दिसावयाचे दोघास-चार बाबा ही रानटी अकर्मे करतोस तू कशी रे का आत्म अंतरीचा देतो रुकार बाबा मिटवावयास विश्वा बघतोस स्वप्न वेड्या घेऊन आपल्यांना मरशील ठार बाबा नापाक हे इरादे फळतील ना कधी ही करणार देव नाही तुजला स्विकार बाबा संदर्भ आयतांचा का लावतोस भलता घेतोस वदवुनी का तू रे मकार बाबा एका तुझ्या मुळे रे सारी जमात दोषी वैश्विक बंधुतेला पडते दरार बाबा
29 likes
41 shares