Back to feed
K
Kiara Sharma Love · Marathi · Life

हि कथा, एकदा नक्की वाचा आणि सांगा कि, याला खरोखर खरंप्रेम म्हणतात कि टाईमपास ----------------------- अहमदनगर जिल्ह्यात एका छोट्याशा गावात दोन गरीब कुटूंब राहत असतात. त्या कुटूंबातील मूलीच्या घरी सतत तिच्या लग्नाविषयी वार्ता होत असतात आणि भांडणही; याबाबतीत तिला काही विचारलं कि, ती सर्वांवर चिडचिडायची, पण खरं तर तिला लग्न करायचं असतं, पण तिच्या पसंतीच्या मुलासंगच. पण त्याआधी तिला तिचं करिअरही घडवायचं असतं. ते मात्र सक्सेस होतच, पण तब्बल सहा वर्षानंतर हे सर्व घडून येतं अन् आनंदाची गोष्ट म्हणजे तिला सनफार्मा या कंपनीत जॉबही लागतो. तिच्या करिअरची सुरुवात होताच तिची आई म्हणते कि, आई -: बाळा, आता तरीलग्न कर ना गं, तुझं वयही वाढत चाललय ती -: आई, फक्त एकाच टॉपिकवर बोलायचे असेल तर प्लिज माझ्याशी वाद नका घालू प्लिज आई -: (परत तेच शब्द ऐकून तिची आई खूपच नाराज होऊन डोळ्यातले अश्रू लपवत निघते) ठिक आहे बाळा, झोप तू ----------------------- काही दिवसांची गोष्ट आहे कि, तिच्या अशा वागण्यावर तिची कुंडली एका ब्राम्हणकडे दाखवली आणि सविस्तर माहिती निघाली कि, ती मूलगी ४ वर्षांपासून एका मुलावर प्रेम करती, पण तो मुलगा त्याच्याच हलगर्जीपणाने आता कोमात आहे आणि तिला लग्न त्याच मुलासंग करायचे असते म्हणून ती सतत टाळाटाळ करत जगत आहे. पण ती तुम्हाला सर्वांना नक्की सांगेल, ते ही स्वत:हून त्यामूळे तिला तुम्ही या गोष्टीवर विचारुच नका. हे सर्व ऐकूण तिची आई जरा हतबललीच आणि काही न बोलता त्यांच आशिर्वाद घेतली आणि निघाली घरी. --------------------- जसं त्यांनी सांगितलं तसं घडलही, तब्बल आठ महिण्यांपर्यंत लग्नाविषयी एकदाही वार्ता नाही घडली आणि ती ही जरा नाराज दिसत होती, तर असच बोलता-बोलता तिची आई तिच्याजवळ जाते आणि विचारते कि, आई -: काय गं, असं का उदास तू ...? ती -: काही नाही गं आई -: खरं सांग मला ती -: अगं खरंच, असं काही नाही आई -: मला माहिती आहे तू का उदास आहेस ते....! ती -: तुला माहिती, कसंकाय ???? आई -: तू नको टेंशन घेऊ, त्याला काही होणार नाही ती -: आई तू काय बोलत आहेस?? आई -: मी जे बोलत आहे, ते अगदी खरंच बोलत आहे ती -: काहीपण हा आई (तोंड फिरवत बोलते) आई -: अगं वेडे, मी तुझी आई आहे मग माझ्याशिवाय तुला कोण ओळखणार?? ती -: हे ही अगदी बरोबर बोललीस, पण तुला कसं कळळलं कि मी त्या मुलाबद्दल टेंशन घेत आहे आई -: हे पहा, मी असं तर नाही बोलले कि, तो मुलगा असू शकेल ती -: पण तुला समजलं तरी कसंकाय?????? आई -: माझ्या मनातलं प्रेम आणि जिव्हाळा हे तू कधीच नाही जाणवू शकत, पण जे प्रेम मी माझ्या मनात वसवलोय ते तुला नक्की समजेल ती -: (हे ऐकूण ती जरा दचकलीच आणि नकळतच अश्रू ओघळले आणि ती तिच्या आईच्या मिठित गेली आणि खूपखूप रडली) आई -: (तिचे ते रडणे पाहून तिला घेउन तसच रुममधे गेली आणि बोलली कि) अगं रडतेस का बाळा, काय झालय बोल मला तू ती -: (खूप फोर्स केल्यावर ती स्वत: बोलली कि,) आई ए क मुलगा आहे, तो ९ वर्षांपासून कोमात आहे आई -: कोण आहे तो ? ती -: राहूरीत राहतो तो, त्याचे नाव पर्वेश आहे आणि त्याच्या ईलाजासाठी अजून १७ लाख रुपये लागतात आई -: पण तुझी नी त्याची ओळख घडली कसंकाय ? ती -: मी माझं कॉलेज शिकत असताना त्याची नी माझी भेट सतत व्हायची आणि तो ही बर्याचवेळी यायचा, कधीमधी मी ही जात होते तिकडे आई -: अच्छा, मग तुला तो हवाय, बरोबर ना ती -: हो, पण ...... आई -: पण वगैरे काही नाही, आपण त्याला आणि त्याच्या घरच्यांना भेटायला जाीउया; ठिक आहे ती -: पण आई..... आई -: जाऊ म्हटले कि, जाउ ती -: ठिक आहे ----------------- दुसर्याचदिवशी ते दोघंही त्याला भेटायला जातात आणि त्या मुलाच्या आई वडिलांना विचारतात अन् ते सर्वकाही सांगून टाकतात, पण औषधाने कितपत ठिक होईल ते ही नाही सांगू शकत. डॉक्टरांनीही बरेच प्रयत्न केलेत पण तरीही देवाकडे त्यांनी सोडलं. पण तब्बल १० वर्षांनी जेव्हा त्या मुलाच हाताती ३ बोटे हालचाल केले, तेव्हा तिथे लक्ष फक्त त्याच मूलीचे गेले आणि ती खूपच दचकून सर्वांना सांगितलं कि, त्याचं-त्याचं-त्याचं हात हालचाल केला आता (४ ते ५ वेळा हेच बोलली पण कुणालाच विश्वास नाही पटत, पण जेव्हा सर्व शांत होतं आणि तो जोरात असा श्वास घेतो तेव्हा सर्वचजण घाबरतात आणि त्यांच्याचपैकी एकजण जाऊन डॉक्टरांना बोलावत आणि त्याच्या तोंडाला ऑक्सिजण लावतात, ते म्हणतात कि, ईट्स मिरैकल. आता आम्हाला पूढचे टेस्ट करता येईल आणि पैशांच लवकरात लवकर बंदोबस्त करा. ------------------ डॉक्टरांचे प्रयत्नही सक्सेस होतात आणि तब्बल १३ वर्षांनी त्या मुलाच सर्व ईलाज होतो आणि २६ लाख रुपये खर्च करुन जे प्रयत्न-देवाला साकडं-मनातली आशा-ते सर्व आरत्या सक्सेस होऊन देवाकडे गेलेला व्यक्ती आज या धरतीवर मोकळ्या मनाने श्वास घेतोय. ---------- जेव्हा त्याचे आईवडिल तिच्या आईला बोलले कि, तुमचे उपकार मी कधीच विसरु नाही शकत; आयुष्यही कमी पडेल तुमच्या उपकारांची परत-फेड करायला. हे ऐकूण तिची आई म्हणाली कि, अहो असं काही नाही, फक्त आमची एक ईच्छा आहे कि, तुमच्या मुलाचं हात आमच्या मूलीच्या हातात द्यावं; बस एका छोट्या व्यक्तीकडून रिक्वेस्ट आहे. हे ऐकूण नशीबच पालटलं आणि ते काही विचार न करता त्यांची मागनी पूर्ण केली आणि खूप हसत गाजत ते सर्व आपापल्या घरी निघाले. चार दिवसांनी मुलाचा फोन येतो आणि म्हणतो कि, नमस्कार आई संध्या आहे; आई म्हणाली, हो आहे थांब बोलावते मी, तेवढ्यात ती येते आणि म्हणते कि, हा बोल रे; तर तो म्हणतो कि, तुला भेटायचय मला येतेस तू...! ती म्हणते हो........ -------------------- दोन दिवसांनी ते परत त्याच्या घरी जातात आणि यावेळी काही क्षण ते एकटेच टेरिसवर भेटतात आणि गप्पा मारत बसतात, असच गप्पा मारत मारत ती म्हणते कि, मला विश्वासच नाही पटत रे आपल प्रेम आपल्याला मिळेल म्हणून, तर तो बोलला कि, का गं? असं बोलत आहेस।ती म्हणते कि, हो रे खरच ना खरंच_नशीब_लागतं_रे_खरं_प्रेम_मिळवायला_नशीब_लागतं.***********~~~~~~~~~~~~~

0 likes 0 shares
WhatsApp