ही कथा ९ भागांची आहे फ्रेंड्स, नक्की वाचा-: भाग -१ -------------------- ही कथा अडीच वर्षाखालची आहे, जिथे मी पूर्णपणे प्रेमाच्या आगरीत भरकटलो होतो; माझ्या कविते, स्टेटस, स्टोरीजची किंमत करणारी एक व्यक्ती होती, जी मला पूर्णपणे स्वत:ला अर्पन केली होती, पण ती घरच्यांनाही घाबरुन रहायची; काही दिवस म्हणजे फक्त आठ ते दहा दिवस चाटिंग करत होतो, मग त्यानंतर ती स्वत:च मला तिचा नंबर दिली आणि रोज न चूकता फोन करायची. असच बोलता मी ही भारावून गेलो अन् तिला बोललो कि, सुरेश -: एक बोललो तर राग नाही ना येणार तुला ग्रेस -: नाही, बोल ना रे सुरेश -: मी खरच तुझ्यावर प्रेम करायला लागलोय, तू ही करतेस ना माझ्यावर प्रेम ग्रेस -: अरे ही काय विचारण्याची गोष्ट आहे का रे बाळा सुरेश -: पण तरीही सांग मला ग्रेस -: हो खूप करते मि ही प्रेम, बस्स सुरेश -: ओह.....आय लव्ह यू पिल्लू ग्रेस -: आय लव्ह यू टू रे सुरेश -: काय करत होतीस तू? (रात्रीचे साडेआठ वाजले होते) ग्रेस -: कदाचित तुझी वाटच पाहत होते मी सुरेश -: सांग ना पण ग्रेस -: काही नाही रे, तू कधी येणार आणि मला मिस्ड कॉल कधी देशील याची वाट पाहत होते सुरेश -: वेडे मी मिस्ड कॉल नाही देत हा, तुच कट करतेस फोन ग्रेस -: मग करणारच ना रे, मला आवडत तुझा कॉल कट करायला सुरेश -: का गं बाई?? ग्रेस -: अरे तुझ्या घरी असं आहे आणि तू ईतकं काम करुन पैसे जमा करतोयस पण तरीही तुझ्याबद्दल कुणालाही काही वाटत नाही ना सुरेश -: जाउदे गं, हाताची पाची बोटे सरळ नसतात ना आपले तसेच माझे आहे ग्रेस -: अरे....अरे, असं नाही बोलायच आणि कुणाला काही वाटत नाही ना तरी चालेल पण मला तर वाटत ना सुरेश -: तू आहेस बोलायला म्हणून तर जगायची ईच्छा निर्माण झाली ग्रेस -: माहिती रे, मग तू टेंशन अजिबात नाही घ्यायच सुरेश -: पण ते न बोलवताच येत मग काय करु? ग्रेस -: हाकलून द्यायच रे सुरेश -: काय तू पण, काहीही बोलतेस ग्रेस -: तूला हसवण्यासाठीच तर बोलते ना मी, पण तू हसतच नाही सुरेश -: हसणे ही विसरलो ग मी ग्रेस -: काय, हा तर मॅटर आहे मग सुरेश -:काय ??? ग्रेस -: हा तर सिरिअस मॅटर आहे, तुला हसायला नाही येत म्हटल्यावर सुरेश -: वेडीच आहे तू, पण एक बोलू तुला ग्रेस -: पर्मिशन लागती का माझी बाळा सुरेश -: नाही गं...... ग्रेस -: मग गं...... सुरेश -: काही नाही, तुला तर चांगल माहिती आहे माझ्याबद्दल कि, माझ्यासंग कायकाय झालय? ग्रेस -: हो माहिती आहे सुरेश -: आणि मी एफ बी वरही तुझ्यासाठीच येत असतो जास्त ग्रेस -: माहिती रे मला, मग काय झालय? सुरेश -: खरं तर मी आजपर्यंत बर्याच एफ बी च्या मुलिंना बहिण माणलोय, पण तरीही त्यांनी माझी साथ नाही दिलीय, पण तू तर माझ्या स्टोरीजने, कवितेने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यावर प्रेम करतेस हेच माझ्यासाठी खूप आहे ग्रेस -: तुला सांगितले ना या गोष्टी विसरायचे म्हणून सुरेश -: कस विसरु गं, त्यांपैकी काही मूलिंचे नंबरही होते आणि "गौरी-पल्लव्वी" या मूली तर दिवसरात्र जस वेळ मिळायच तस बोलायचे, मग या मूली जवळ करुन एकदाच लांब का फेकून देतात? ग्रेस -: तू त्यांना नंबर द्यायचाच नव्हता आणि त्यांचाही नंबर तू घ्यायचा नव्हता, या मुली असतातच असे रे म्हणून मी तुला कितीतरीवेळा सांगितले कि, नको बोलत जाऊ तू मुलिंसंग सुरेश -: मी नाही बोलत गं, पण एखादी मूलगी सतत बोलून बोलून एकदाच लांब सारती मग असे मूली का करतात? हाच मोठा प्रश्न पडतो ग्रेस -: तुला एक सांगते ऐक, मूली एफ बी वर फक्त मूलांना सतवायला येत असतात, त्यांच्या मनातल ओठांवर कस आणायचे हे मूलिंना बरोबर माहिती असत सुरेश -: ते मलाही माहिती आहे ग, पण मी खूप सार्या मूलिंना बेस्ट फ्रेंड होशील का? हेच विचारतो आणि काहींना माझी सिस्टर होणार का? हे ही विचारतो, ते "हो" ही म्हणतात, मग अर्ध्यातच का सोडतात ? ग्रेस -: मला या मूलिंच काही घेणं नाही आणि चांगलच माहिती मला कि, या मूलिंची जात कशी आहे? त्यांना मूलांच मन कधीच जाणून घ्यायच नसत सुरेश -: तुझ ही बरोबर आहे आणि मी गौरीला माझ्याबद्दल सर्व सांगितल होत कि, माझी गर्लफ्रेंड वारली म्हणून माझ्याच हलगर्जीपणाने, पण तिने तरीही मला विचारल कि, दादा तू लग्न का नाही करत? मी तिचे हे बोल ऐकूण फक्त एकदिवस बोललो आणि त्यांनंतर तिला मी काहीच बोललो नाही, मग काही दिवसांनी ताचाच फोन आला आणि तिच बोलायला सुरुवात केली (त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आले) ग्रेस -: हे पहा बाळा, रडू नको आणि काय बोलली ती तुला? मला सांग तू सुरेश -: कसं सांगू, एका बहिणीच्या नात्यानेच बोलली आणि खर सांगतो कि, माझे एफ बी चे जवळ जवळ १६अकाउंट तिनेच क्लोज केलेत, कारण एका भावाच तिला खूपच त्रास होत होता म्हणून पंधरा ते वीस दिवस अकाउंट चालायच आणि लगेच बंद व्हायच ग्रेस -: अरे तू तिला एड तरी कशाला करत होता मग, तुझ्याशी ती कस बोलत होती? तुझे अकाउंट ब्लॉक करुन क्लोज करायची पण तरीही तू तिला एड करायचा सुरेश -: अगं पण मला हे नंतर समजल आणि ज्यावेळी ते जाणवल त्यावेळी मी तिचे दोन्ही अकाउंट ब्लॉक केल आणि "फक्त सुरेश" हे ओपन केलो ग्रेस -: मग आता चालतय ना अकाउंट तुझ चांगल, ती दिसते का मग तुला? सुरेश -: ब्लॉक केल्यावर कसं दिसणार वेडू ग्रेस -: हो का.....बरं चल टेंशन नको घेऊ मी आहे ना तुझ्यासंग सुरेश -: हो ना गं, "तू आहेस, म्हणून मी आहे आणि दोघही आहोत ना तर मग सर्वकाही आहे ग्रेस -: हो का..... मला माहितीच नव्हत रे सुरेश -: हो का रे ??? ग्रेस -: हो रे, चल बाळा दादा आला माझा आपण नंतर बोलू, बाय लव्ह यू.....मिस यू.....किस यू.....हाहाहाहा सुरेश -: वेडी आहेस गं तू, बाय लव्ह यू टू, मिस यू टू आणि लाँग किस यू टू बाय........हाहाहाहाहा ------------------------------- अस बोलून आम्ही नेहमीसारखे घरी गेलो आणि जेवत बसलो, जेवताना ही तिला मी एफ बी वर आणि व्हॉट्सअपवर मेसेज करायचो,ती नसायची पण मी मात्र ऑनलाईन असायचोच. रोजरात्री मी ४वाजल्याशिवाय नाही झोपायचो पण हे जेव्हा तिला समजले तेव्हा मात्र मला खूप ओरडली आणि आता ------------ बाकीची कथा पुढच्या भागात वाचा
0 likes
0 shares