Back to feed
A
Avni Chauhan Love · Marathi · Romantic

हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ??? कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ??? कशाला म्हणतात प्रेम ?? कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत ?? दिवसरात्र तिचा विचार करण हे प्रेम असत ?? येणार नाही माहित असुनही तिच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत ?? की ती नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत ?? फेसबुक वर सारख तिच्या प्रोफाइल ला विझिट करणं... तिचा नंबर डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करणं याला प्रेम म्हणतात ?? मी बोलणारच नाही तिच्याशी ठरवूनही ... फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करणं याला प्रेम म्हणतात की तिला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही तिच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात ?? तिच्या एका नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात ?? तिच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात ?? तिच्यासाठी वाटनारया काळजिला प्रेम म्हणतात ?? की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात ??

0 likes 0 shares
WhatsApp