हो मी बदलतोय .......!! हो मी बदलतोय .... आधी फक्त माझे मित्रच म्हणायचे आता माझ्या घरचे हि म्हणतायत हो मी बदलतोय .... आजकाल मी थोडा वेड्या सारखा वागतो रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठतो रोज सकाळी तुला बघाव म्हणून वॉकला जातो आल्यावर शांतपणे तुझा चेहेरा आठवतो तुझ्या विषयी तुझ्याच समोर बसून बोलतो तुला हसताना पहाव म्हणून मीच प्रयत्न करतो तुझ्याशी बोलायचं ठरवतो कधी हळूच तुझ्या जवळ येतो घाबरून परत फिरतो ; पण दुसर्या दिवशी बोलायचं ठरवतो मित्रांच्या गप्पान मध्ये रंगणारा मी फोने वर तुझ्याशी तासान तास बोलतोय मुलींशी करायचो FLIRT आधी हळू हळू ते सारं विसरतोय मैत्रीच्या प्रयत्नानंतर हळूच पुढच पाऊल टाकतोय तुझ्या प्रेमात पडतोय प्रेम काबुल करायला आजचा दिवस ठरवतोय तुला सुखद धक्का देण्याचा प्रयत्न करतोय कदाचित मी जरा जास्तच बदलोय
0 likes
0 shares