Back to feed
A
Atharv Kapoor Love · Marathi · Romantic

♥ हृदय स्पर्शी प्रेम कथा(एक प्रेमसंघर्ष..) आज तिच्या आग्रहाखतर मी तिच्या घरी आलोय तिच्या, वडीलांकडे तिच हात मागायला.मी खुपच कॉन्फीडंट, होतो.... त्यांनी मला विचारलं तु काय करतोयस...? मी म्हणालो मी एक बिझीनेस अॅडमिनिस्ट्रेटर आहे,आणि सॅलरी...? मी म्हणालोँ 15000p.m... मग तुला काय वाटतं,एका 500करोड प्रोपर्टि असणार्या, बापाच्या मुलीला तु 15000 रु महीना इतक्या पगारामध्ये, सुखी ठेवु शकशील.... मी म्हणालो,सर सुख काय असतं...? पैसा म्हणजे सुख मिळवण्याचा एक पर्याय आहे... पैसा म्हणजे सुख नाही,सुख म्हणजे ही फक्त एक भावना आहे जी, फक्त तुमचं माननं न मानण्यावर आधारित असते.... आता तीला जर तुमच्या 500 करोड प्रोपर्टिपेक्षा माझ्या 15000रु... महीना या पगारात सुख दिसत असेल तर त्यात गैर काय आहे.... काहीही असो पण मी माझी मुलगी इतक्या कमी पगार, असणार्या माणसाच्या हातात देऊ शकत नाही... त्यांनी handshake केला आणि मला जायला सांगितलं.... मला खुपच आश्चर्य वाटलं,त्यांनी माझं नावही विचारलं नव्हतं,आणि मला जायला सांगितलं.. तीने वडीलांना खुप समजावण्याचा प्रयत्न करत होती,पण ते काही ऐकुन घ्यायला तयार नव्हते.... मी तिथुन निघालो,मला त्यांच्या संकुचित स्वभावाची खुप कीव येत होती... श्राविकाने मला कॉल केला आणि ती म्हणाली माझे पप्पा माझ्या लग्नाला तयार नसले तरी काय झालं,आपण, पळुन जाऊन लग्न करुया.... मी तिला म्हणालो कोणाच्याही, मनाविरुद्ध मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, श्रविका ते तुझ्याविषयी कदाचित योग्य तोच निर्णय घेतील... तु मला आता विसर श्रविका... असं म्हणुन मी फोन कट केला.... तिचे पुन्हा पुन्हा फोन येऊ लागल्यावर मी सिमकार्ड काढुन फेकुन दिलं.... खुपचनिराश झालो,आणि मी हे शहर सोडुन इथुन दुर निघुन गेलो.... दहा वर्षानंतर..... आज मला एका कंपनीसोबत एक करार करायचा आहे ज्याने, माझ्या कंपनीला फायदा तर होईलच पण,त्याहीपेक्षा जास्त, समोरच्या कंपनीला होईल.... त्या कंपनीची GROWTH तशी बरी आहे.... पण वैयक्तिकरित्या याच कंपनीबरोबर मला हा कॉन्ट्रेक्ट, करायचाय,मिटींगला सुरुवात झाली खरी पण समोरच्या, कंपनीचे ऑनर अजुन यायचे होते.... ते आले आणि मला पाहुन दचकलेच, कारण मी तोच मुलगा होतो ज्याला दहा वर्षापुर्वी त्यांच्या, मुलगीसाठी त्यांनी नाकारलं होतं.कारण एकच, पैसा.... आणि आज त्यांच्या कंपनीला पुढे जाण्यासाठी आमच्या कंपनीशी, पुढील पाच वर्षासाठी करार करायचाय.... आमची या, प्रोजेक्टवर पुर्ण चर्चा झाली,आणि आता मला निर्णय घ्यायचाय.... पेन आणि डीलसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे माझ्या हातात आहेत,त्यांना जरा भीतीच वाटतीये, की या डीलवर आमचं पर्सनल रिलेशन्स तरी परिणाम करणार, नाहीत ना....? पण मी डील साईन केली,तेव्हा कुठे जाऊन त्यांना हायसं वाटलं.... डील फायनल झाली,आम्ही दोघेही खुश होतो या डीलसाठी,मिटींगनंतर पर्सनली ते मला भेटायला आले.... ते, मला म्हणाले,सर मला माफ करा,जे दहावर्षापुर्वी झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो,मी तसं करायला नको होतं..... मी म्हणालो,अहो तुम्ही पहीला तर मला अहो जाहो करु, नका,मी तुमच्या मुलासारखा आहे... आणि त्यावेळेस तुम्ही जे, वागलात ते त्यावेळेस एका वडीलांच्या, दृष्टीकोनातुन बरोबर होतं.... पण तुम्ही माझा आणि तुमच्या मुलीचा दृष्टीकोन समजुन, घ्यायला हवा होता..... दहा वर्षापुर्वी 15000 महीना कमावणारा मुलगा आज अडीच हजार कोटीँचा मालक आहे.... आणि त्यावेळेस पाचशे कोटीँची उलाढाल करणारी तुमची, कंपनी आज आठशे कोटींची उलाढाल करते.... म्हणुनच कधीही कोणाच्या आत्मविश्वासाला कमी समजु नका.... त्यांना हे ऐकुन खुपच वाईट वाटलं,मी त्यांना म्हटलं श्रविका कशी आहे...? कुठे असते ती आता..? लग्न झालं का तिचं..? ते म्हणाले नाही,तिचं लग्न झालं नाही अजुन... ती म्हणते ती तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न करणार नाही,आजही ती तुझ्याच आठवणात जगतीये... त्यांच्या या शब्दानंतर तर मला काही कळतंच नव्हतं, काय रिएक्शन द्यावं. माझ्या त्या एका निर्णयानंतर ती अशी, रिएक्ट करेल याची काही कल्पनाही नव्हती... मी तर लग्न करायचंच नाही असं ठरवलं होतं... ते हात जोडुन माझ्याशी म्हणत होते,मला माफ कर त्यावेळी, मी तो चुकीचा निर्णय घेतला नसता तर,माझी मुलगी आज दहा, वर्षे तुझ्या आठवणीत तडपली नसती,तीला ते दहा वर्षाचं दुःख, मीच तिच्या माथी मारलंय.मला माफ कर..... मी तिला, भेटण्याची इच्छा व्यक्त केली... नंतर दुसर्याच दिवशी मी तिला भेटायला गेलो,आज दहा वर्षानंतर मी तिला पाहीलं,ती गार्डनमध्ये बसली होती,मागुन जाउन तिच्या खांद्यावर मी, अलगद हात ठेवला.... तिने मागे वळुन पाहीलं,तिच्यासमोर मी आहे,हे तिने पाहील्यावर,ती माझ्या डोळ्यातच बघत राहीली,तिचे ओठ थरथरत होते.... काय बोलावं आणि काय नको,हे कळतंच नव्हतं आम्हाला... शब्दांनिच पाठ फिरवली होती.... उशीरापर्यंत डोळेच बोलत होते आमचे,म्हणुनच की काय, त्या दहा वर्षांच अंतर मोजण्यासाठी तिच्या डोळ्यातील, एक अश्रु बाहेर आला असावा.... आम्ही दोघांनी एकमेकांना, इतकी घट्ट मिठी मारली की,वार्यालासुद्धा आमच्या मधुन, जाण्यासाठी आमची परवानगी घ्यावी लागली असती.... दहावर्षांचं ते अंतर सातफेर्याँमध्ये कधी रुपांतरीत झालं हे, कळलंच नाही.... आणि तेही सासर्यांच्या संमतीने,मला तर खरंच विश्वासही बसत नव्हता आणि तिलाही..... मी तिच्यासाठी, आयुष्यभर ते बनायचं ठरवलं,जे झाड एका माणसासाठी बनतं,पापण्या डोळ्यांसाठी बनतात,पाणी तहानलेल्यासाठी बनतं........ आणि तेच प्रेम मी तिच्यावर समर्पित केलंय आज...... मित्रांनो खुप वेळा आपल्या प्रेमाला आपल्या घरच्या, प्रेमाला विरोध होतो,खुप मोठा विरोध,तुमचं जर तुमच्या, जोडीदारावर खुप प्रेम असेल आणि, त्याच्याशीच लग्न, करायची इच्छा असेल तर अशावेळी एकच करायचं, काहीवेळासाठी आपला मुळ स्वभाव बाजुला ठेवायचा,आणि आईवडीलांना तुम्ही योग्य पद्धतीने पटवुन द्यायचं,आणि तरीही त्यांनी तुमच्या लग्नाला विरोध चालु ठेवला तरी, तुम्ही तुमचा मुद्दा सोडायचा नाही.... कधीच नाही थोडा वेळ लागेल पण तुम्ही बरोबर असाल तर ते नक्कीच विरघळतील.... पण हे, तेव्हाच घडु शकतं जेव्हा तुम्हा जोडीदारांचा एकमेकांवर "पुर्ण" विश्वास असेल,आणि जीवनाचा साथीदार निवडतानाही योग्य तोच निवडा,तुमची lovelife नक्कीच success होईल.. "आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे.. कि, प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे.. आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे.. कि, आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे.." खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही..

0 likes 0 shares
WhatsApp