Back to feed
S
Sara Verma Love · Marathi · Life

हृदयस्पर्शी कथा निवेदिताची अभिमन्यूशी ओळख झाली तीच एका उदात्त भावनेतून.. अभिमन्यू अंध होता. त्याला परीक्षेचे पेपर्स लिहायला writer हवा होता. निवेदिता नेहेमीच अशा कामां,सून मदत करायची. त्यामुळे हि संधी सुधा तिलाच मिळाली आणि 10th पासून त्याचे आजपर्यंतचे CA Final चे पेपर्स तीच लिहित आली होती . ती त्याच्यापेक्षा जरा लहान होती , पण त्या दोघांमध्ये आता छान मैत्रीच नात गुंफला गेल होत... अभिमन्यू हुश ार होता . कोणत्याही गोष्टीत अपयश कसा ते माहितच नवत त्याला .त्यातून निवेदिता ची साथ मिळाल्यामुळे हुरूप येऊन तो दुप्पट उत्साहाने प्रत्येक गोष्ट करायचा . तीसुद्धा कायम त्याला प्रोत्साहन देत राहायची , तिच्यापुढे नेहेमीच त्याचा आदर्श होता . दोघांच्या हि घरी ते माहिती होते , आणि त्याबद्दल त्याचं भरपूर कौतुकसुधा व्हायचं. यथावकाश अभिमन्यू कॅ झाला ,निवेदिता सुधा 1st class distinction मिळवून B.Com झाली..पण एवढ सगळ होताना निवेदिताच्या मनातला तो कोमल हलवा कोपरा अभिमन्यूने कधी व्यापला ते तीच तिलाच कळला नाही . खूप वेळा तिने त्याला विचारायचा प्रयत्न करून पहिला होता पण तिला धाडस होईच ना. तिला नेमका अंदाज येत नव्हता अभिमन्यूचा मनातल्या विचारांचा. त्याने आत्तापर्यंत तसा कधीच दाखवल नवत त्यामुळे तर ती अजूनच घाबरायची. एकदा ते दोघे असेच फिरायला म्हणून बाहेर पडले होते ..वसंत ऋतू होता आणि निवेदिताला अजूनही तीच मन मोकळ कारण जमलाच नव्हत. ती नुसतीच चालत होती त्याच्याबरोबर. एका बेंचवर ते दोघे बसले. अभिमन्यू म्हणाला, "वसंत खूप छान असतो ना? कशी दिसतेय हि बाग सांग ना .. ती एकदम रंगत येऊन सांगू लागली ani तो ऐकत राहिला, "सगळीकडे हिरवगार आहे, छान फुल आहेत, फुलपाखर सुधा आहेत..." बराच वेळ बोलत राहिली.. पण अचानक भानावर येऊन थांबली आणि नुसतीच बसून राहिली. अभिमन्यू म्हणाला , "का ग एकदम अशी गप्प झालीस? किती छान बोलत होतीस.. सगळ मी पाहतोय असाच वाटत होत. सांग ना पुढे..." तो एवढा म्हणेपर्यंत निवेदिताच्या गालावरचा अश्रू त्याच्या हातावर पडला.. तो म्हणालाच.. "का रडत्येस ग?" ती पटकन डोळे पुसून "मी नाही रडत" म्हणाली. "आता मात्र मी चिडीन हा. "तो म्हणाला , "सांग काय झाल. " ती म्हणाली ,"मी विचार करत होते ,कि ...कि ...." "आग बोल " "कि ....हे सौंदर्य नेहेमीच माझ्या डोळ्यांनी पाहायला आवडेल का तुला ?" अभिमन्यूला तिने मनातले कळायला २ क्षण जावे लागले.तो काही बोलायच्या आतच ती पुन्हा म्हणाली , "हे बघ, आयुष्य सोपा नाहीय ह्याची जाणीव आहे मला..पण मी नाय घाबरत त्या आयुष्याला कारण तेवा तू असशील माझाबरोबर. नाही राहू शकणार मी जर तू नाही म्हणालास तर, तुटून जाईन...."आणि तिला हुंदका फुटला.. अभिमन्यूने काहीच न बोलता तिला जवळ घेतले आणि मूकपणे तो तिला थोपटत राहिला.. आणि अशाप्रकारे अजून एका हृदय स्पर्शी नात्याची सुरुवात झाली...!!

0 likes 0 shares
WhatsApp