***हिरा **** एकदा एका मुलीनं तक्रार केली बापाकडे . मलाच का बंधने ?? जाऊ नको कुणीकडे का सारखे कपडयांवरून बोलने आणि माझ्या मित्रां बाबत चौकशी करणे?? . का मीच उंबर्याच्या आत रहायच, आणि उठता बसता स्वतःला सावरायच ?? . बाप बोलला, बेटी म्हणणे तुझं पटतयं, चल जरा बाहेर आत खूप उकडंतयं.. . पेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं बाहेरच पडल होत, अवजड सामान लोहाचं,, . बाप बोलला , बेटी! हे, ऊनपावसात इथंच असतं तरी पण याला काही होत नसतं, कोणी नेत नसत. किमतीत पण याच्या ,अधिक उणं होत नसतं... . जरा पुढे जाताच , ज्वेलरी शाँप दिसलं आत जाऊन मग, बापने हिर्याच मोल पुसलं तिजोरीतून बंद पेटी, हळूवार पुढे मांडली त्याच्या झगमगाटात, नजरच दिपली... . सराफ बोलला किमती आहे, फार जपावं लागतं जरा सुद्धा चरा पडता, मोल याचं कचर्याच होत. काळजी घेऊन खूप, मलमली कपड्यात जपून ठेवावं लागतं, तिजोरीच्या आत, लपवावं लागतं... . फिरून घरी येताच, बाप बोलला "बेटी! तूच तर माझी, हिर्याची पेटी,, . सांग तुला जपण्यात ,काय माझं चुकतं तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"... . "तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही तू म्हणजे अनमोल हिरा, सांग चुकतं का काही, तुझ्यामुळेच घर प्रकाशित, आमचा तु अभिमान, तुझ्यासाठी काळीज तुटतं, तु जीव की प्राण"... . सर्व बघुन मुलीचे डोळे पाणवले, बापापुढे झुकली मान शरमने... कळल तिला सगळ, मन तीच हेलावल... "बस्स! करा बाबा "ऎकवत आता नाही, तुमच्याकडे माझी, तक्रार मुळीच नाही . मीच मला आता, जीवापाड जपेन हिर्याच्या तेजानं, चौफेर चमकेन."... . मुलगा मुलगी समसमान, हे जरी असलं खरं पण आपल्या बहिन-लेकिला अधिक जपलेलेच बरं... पटवून द्या तिला -- बेटी! तू हिरा आहेस,, आमच्या आनंदाचा तू झरा आहे ... म्हणुन जपाव लागत...
0 likes
0 shares