Back to feed
T
Tara Nair Love · Marathi · Romantic

हळूच तुला चोरून बघायचंय.... नजरेशी थोडं खेळायचं.. थोडं अवघड आहे गं..... पण तुझ्यासोबत पुन्हा जगायचंय !! तुझ्यावर थोडं रुसायचंय, मनवन्याच्या प्रयत्नात तुझं प्रेम मिळवायचंय.. थोडं अवघड आहे गं… पण तुझ्यासोबत पुन्हा जगायचंय !! तुझ्याशी बोलताना शब्दांमध्ये अडकायचंय, खांद्यावर डोकंटेकवून मन हलकं करायचंय, थोडं अवघड आहे गं... पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय !! त्याउगवत्या सूर्याला भेटायचंय, तुझ्या हातातहात घालून त्यालाही थोडं जळवायचंय, जराअवघडच आहे गं.... पण तुझ्या सोबत पुन्हाजगायचंय !! तुलाही एकदा मनवायचंय, पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय, थोडं अवघड आहे गं... पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय..!! .......नकटे......

58 likes 48 shares
WhatsApp