Back to feed
A
Aarav Sharma Birthday · Marathi · Motivation

*"अमृताशीही पैजा जिंकेल"* अशी आपली मराठी भाषा. ज्ञानेश्वरांनी रुजवलेले मराठीचे बीज येथे रुजले, वाढले, त्याचा वटवृक्ष झाला. रस आणि माधुर्याने परिपूर्ण, शब्दविलासाने नटलेली, विविध बोलींचे लेणे लेऊन आलेली, साहित्यिकांच्या लेखणीने समृद्ध केलेली मराठी भाषा हा आपल्या सर्वांचाच मानबिंदू आहे. मराठी भाषेला आपल्या साहित्याने समृद्ध करणारे *कविवर्य कुसुमाग्रज* यांचा जन्मदिन हा आपल्यासाठी गौरवदिन. मराठी भाषा दिन साजरा करतानाच मराठी भाषेचे संवर्धन आणि जोपासनेची धुरा अभिमानाने पुढे नेऊया. *मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...* *!!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !!!*

257 likes 27 shares
WhatsApp