Back to feed
A
Arjun Patel Good_Morning · Marathi · Rain

फुल म्हणजे मातीचा हुंकार; पावसाच्या प्रत्येक थेंबाला दिलेला प्रतिसाद. म्हणुन एक फुल एकदाच जन्माला येतं. ह्या फुलातला सुगंध म्हणजे आकाशतत्त्व कारण त्याला अंत नाही. सुगंधाचा प्रारंभ अणि शेवट शोधता येत नाही. म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यत त्याचं आकाश. वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मीलन अंकुरीत झालं हा संदेश माणसांपर्यंत नेणारा दूत. एका फुलात, मला इतकं दिसतं. शुभ सकाळ मित्रांनो

120 likes 6 shares
WhatsApp