Back to feed
S
Sai Malhotra Birthday · Marathi · Patriotic

हनुमान जन्मोत्सव साजरा करा , हनुमान जयंती नव्हे ! अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण: | कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन || सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम् | जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित || अर्थात : अश्वथामा, दैत्यराज बलि, वेद व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कण्डेय ऋषि या आठ व्यक्ती चिरंजीवी असून नित्यनियमित त्यांचे प्रातः स्मरण केल्यास सर्व प्रकारच्या आजारापासून, व्याधींपासून मुक्तता होते. तसेच शंभर वर्षापर्यंत आयुष्य प्राप्त होते. चिरंजीवी हनुमान : श्रीरामाच्या आज्ञेनुसार हनुमान सीतेच्या शोधार्थ श्रीलंकेत अशोक वाटिकेत आले. तेथे त्यांची सीतेची भेट झाली. हनुमानाने श्रीरामाचे कुशल सांगितले आणि त्यांचा संदेश देखील दिला. तो ऐकून सीतामाई प्रसन्न झाल्या आणि त्यांनी हनुमानाला अजरामर राहण्याचा वर दिला. अजरामर म्हणजे अशा व्यक्तीस मृत्यू नाही आणि वृद्धत्व देखील नाही. अशा या चिरयुवा हनुमानाचे शक्ती स्वरुपात उपासना केल्यास कलियुगात ती लगेच आपल्या भक्तांवर त्वरीत प्रसन्न होणारी देवता आहे. हनुमान जन्मोत्सव का ? आणि हनुमान जयंती का नाही ...? ज्या व्यक्ती मृत पावल्या असून त्यांच्या स्मरणार्थ जन्मदिवस साजरा करणे म्हणजे जयंती. आणि येथे तर हनुमानजी चिरंजीवी असल्याने त्यांची जयंती साजरी न करीता जन्मोत्सव साजरा करणे हेच योग्य आहे. सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

49 likes 52 shares
WhatsApp