Back to feed
R
Rudra Reddy Social · Marathi · Social_Awareness

असं अंधारून आलं ना की, आकाशातून पावसाच्या सरींगत उतरतात काही निरुत्तर प्रश्न आणी काही उत्तरे, प्रश्न नसणारी .. काळोख त्याची मिठी अधिकच घट्ट करतो, घुसमट गोंजारत एक निळी सावली ओळख सांगू पहाते .. काही उभ्या रेषा, काही आडव्या रेषा, काही वळणे, काही वेलांट्या, काही उसासे अहंकार, काही निशब्द उमासे, निथळू पहातात देहाला पाझर लागल्यात, निळी सावली बंद दरवाजातून आत येऊ पहाते .. रस्ता संपत असावा बहुदा इथे. पाठ फिरवली तर, भला थोरला दरवाजा डोळ्यादेखत मिटून घेतो त्याचे आवास, ही गूढ तरीही हवीशी निळाई, आसमंत व्यापून अधिकच पसरते ... असं अंधारून आलं ना की, ओळख देख नसलेली कोणी कविता, अलगद अंतरंगात उतरते...

258 likes 42 shares
WhatsApp