Back to feed
A
Anaya Das Social · Marathi · Social_Awareness

*"माणसाची कविता"* मी *"छत्रपतींवर"* कविता लिहिली.. त्यांनी मला फोन करून विचारले, *"तुम्ही मराठा आहे का?"* मी *"बाबासाहेबांवर"* कविता लिहिली.. त्यांनी मला फोन करून विचारले, *"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"* मी *" महात्मा फुलेंवर"* कविता लिहिली.. त्यांनी मला फोन करून विचारले, *"तुम्ही माळी आहे का?"* *मी अहिल्या देवींवर कविता लिहीली...* त्यांचा मला फोन आला अन विचारले, *"तुम्ही धनगर अहात का..?"* मी *"माणसावर"* कविता लिहिली, मला फोनच आला नाही... वाट पाहतोय.. *माणसे गेली कुठे फ़क्त आणि फ़क्त जात राहिली आहे* 🤔🤔🤔 ✍🏻... माणूस बना

226 likes 45 shares
WhatsApp