Back to feed
R
Rudra Malhotra Social · Marathi · Social_Awareness

*आमदारांनो हा घ्या आदर्श !!!* वेतनवाढ तर कोणीही घेईल !! *गणपतआबा देशमुख ,शे .का .प. आमदार सांगोला ,*12 वेळा सलग आमदार ,वय वर्षे 94,गीनीज बुक मध्ये सलग निवडून येण्याचा विश्वविक्रम !!! आजही आनवाणी पायी फिरतात !!! घरात अठराविश्व दारिद्र्य !! पैशासाठी मोठ्या मुलाची आत्महत्या !! सोलापूरला असताना वैयक्तिक कामाच्या निमित्तानं सांगोल्याला गेलो होतो. गणपतरावांच्या ऑफिसमध्ये साध्या लाकडी खुर्च्या ठेवल्या होत्या. गावातले लोक त्यांना आबा म्हणतात. आबा आणि आबांचं हे घर पूर्वीपासून असंच, साधं असल्याचं गावकरी सांगतात. या वयातही आबा सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करतात. रात्री उशिरापर्यंत ते सुरू असतं. सर्व अधिकारी त्यांना मानतात. त्यांनी सांगितलेलं काम झटपट करतात. सांगोल्यात तर सरकार दरबारी लोकांची कामं अडवली जात नाहीत. डोंगराएवढं काम करून हा मनुष्य `मी केलं.’ असं म्हणत नाही. सतत आम्ही केलं, आमच्या पक्षानं केलं असं म्हणतो. सभा संपल्यानंतर त्यांच्यासोबत सूतगिरणीतल्या गेस्ट हाऊसवर गेलो. भव्य परिसर. जवळ आलेल्या कर्मचार्याला त्यांनी सांगितलं, `हे शिक्षणसेवक आहेत. यांची इथं रहायची व्यवस्था करायची. चांगली रुम द्या. गेस्ट हाऊसमध्ये एवढय़ा उशिरा जेवण शिल्लक नसणार. हे शंभर रुपये घ्या. जवळपासच्या हॉटेलवर यांना जेऊ घाला. या शंभर रुपयांत आताचं जेवण उद्याचा नाश्ता होईल. उद्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था मी करीन.’ना गेस्ट हाऊसवर मटणाचा रतीब ना कार्यकर्त्यांसाठी खास सोय फक्त आणी फक्त काम काम आणी काम. 12 वेळा आमदार होऊन किमान 6 ते 7 वेळा आदर्श व उत्कृष्ठ संसदपटु ठरले सभागृहाचे प्रत्येक वेळेस तालीका अध्यक्ष झाले पण कधीही कुठल्या पुरस्काराची जाहीरात नाही की दिखावा नाही निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना दारु नाही की मटण नाही. प्रत्येक कार्यकर्ता स्वखर्चाने आबांसाठी खर्च करतो. राजकीय आकसाने कधीही कुठल्याही प्रकारचा निधी अडवला नाही उलट आपली ताकत वापरुन तो अधिक कसा मिळेल व लवकर कसा येईल यासाठी धडपडतील. ऊभ्या केलेल्या संस्था नेहमी उत्कृष्ठच राहील्या पण संस्थेचा पैसा व कर्मचारी कधीही स्वत:साठी वापरला नाही ना आपल्या वाहनाचे भाडे डिझेल ड्रायव्हर पगार घेतले. असे हे अलौकीक व्यक्तीमत्व .. आज त्यांचा वाढदिवस आमदार कसा असावा यांचे उदाहरण त्यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मला इतर सहकार सम्राटांचा बडेजाव, त्यांचं वैभव आठवलं. हा नेता असा. तळं राखलं पण पाणी चाखल्याचे आरोप त्यांच्यावर कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात गणपतरावांसारखा बिनडागाचा नेता आपलं काम नेकीनं पुढे नेतोय. त्याना पाहून मला तुकोबारायांचा अभंग आठवतोय. चंदनाचे हात, पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगे साकर अवघी . 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏

232 likes 81 shares
WhatsApp