उन्हामुळे मृत्यू का होतो? आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? 👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात 👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. 👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं 👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. 👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) 👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात. 👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. 👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो. 👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे. Hot and cold food list सफरचंद - थंड चिकू - थंड संत्री - उष्ण लिंबू - उष्ण कांदा - थंड बटाटा - उष्ण पालक - थंड टॉमेटो - उष्ण कारले - उष्ण कोबी - थंड गाजर - थंड मिरची - उष्ण मका - उष्ण मेथी - उष्ण वांगे - उष्ण भेंडी - उष्ण बीट - थंड बडीशेप - थंड वेलची - थंड पपई - उष्ण अननस - उष्ण डाळींब - थंड ऊस - उष्ण मीठ - थंड मूग डाळ - थंड चणा डाळ - उष्ण गुळ - उष्ण तिळ - उष्ण शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण हळद - उष्ण कॉफी - थंड दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो . ✍🏻 आयुर्वेदातून संकलन
M
Manav Nair
Social · Marathi · Social_Awareness
241 likes
44 shares