Back to feed
V
Vihaan Bagale Social · Marathi · Social_Awareness

एक प्रयत्न! सांज रंगते कवेत होत रोज सावळी घोष कृष्ण कृष्ण होत रोज विश्वराउळी सप्तसूर नादतात, वेळुच्या बनी जिथे तान घेत साथ देत, वाहते नदी तिथे नाम घेत गोरजात, मृत्तिकाच पाउली श्यामरंग सागरात श्याम श्याम गाज ती श्यामवर्ण बिंबरूप अंतराळ सोबती धन्य होत मध्यमेत श्यामला घरातली अष्टमी निमित्तमात्र रासरंग त्यासवे उत्सवात रोज रोज आसमंत जाणवे पार्थबोधिका अमर्त ऐकु ये स्वरातली

76 likes 3 shares
WhatsApp