एक मनुष्य शेतातून जातांना भगवंतावर टीका करून म्हणतो , " या भगवंताला काही डोके नाही . पहा , हा एवढा मोठा आम्रवृक्ष ! पण त्यालाएवढे लहान फल आणि ही पहा जमिनीवर सरपटणारीवेली , तिला केवढेमोठे टरबूज !वास्तविक मोठ्या झाडाला मोठे फल व लहान झाडाला लहान फल , असे नको का करायला ?"असे बडबडत तो त्या झाडाखाली झोपला .त्याला झोप लागताच त्या झाडावरून आंब्याचे एक फल त्याच्या नाकावर पडले . त्याने त्याला ग्लानी आली व नेत्रात पाणी आले आणि त्याला स्वत:लाच समजले की या आम्रवृक्षाला या छोट्या फलाऐवजी मोठे फल लागले असते , तर आज माझ्या नाकाचे काय झाले असते ?यावरून हे लक्षात घेण्यासारखे आहे की , भगवंताच्या कृतीत कुठेही अपुरेपणा नाही . तो स्वत: तर संपूर्ण आहेच पण त्याने जे जे निर्माण केले त्यात कुठेही अपुरेपणा दिसत नाही . म्हणून आपण प्रेम करावे ते देवावर, आधार घ्यावा देवाचा
V
Vanya Pawar
Social · Marathi · Social_Awareness
4 likes
58 shares