I
Ira Bose
Social · Marathi · Social_Awareness
ऑक्टोबर सरत चाललाय तशी थंडीची चाहुल लागायला सुरूवात झालीय..काही दिवसांनी बेडच्या आत, कपाटात, वाॅडराॅबमध्ये कोंबलेले स्वेटर्स बाहेर डोकवायला लागतील..त्यात ओल्ड फॅशन जॅकेटस्, मफलर, कानटोप्या, आकसलेले पण थंडीपासून वाचवणारे स्वेटर निघतील आणि कदाचित यावर्षी नवीन ट्रेंडप्रमाणे नवीन खरेदीही होईल... पण तुमच्या जुन्या स्वेटरच काय?? फेकून द्यायचा विचार असेल तर या वर्षी एक गोष्ट करा..आपले जुने स्वेटर स्वच्छ धुवुन आपल्या कारच्या किंवा बाईकच्या डिकीत ठेवा..आणि ऑफिस, काॅलेज किंवा बाहेर जाताना अशी चिमुकले रस्त्यावर कुडकुडताना दिसले तर त्यांना हे स्वेटर देऊन आपल्या वाट्याची माणुसकिची ऊब देऊन बघा...तुमची थंडीही त्यांचे हसरे चेहरे पाहून दुर पळतील.... एक हात मदतीसाठी.......🙏🙏
202 likes
51 shares