Back to feed
P
Prisha Bose Social · Marathi · Social_Awareness

कोणी मारला माणूस माणसानेच मारला कधी वाईट प्रथानी कधी अंधश्रद्धेने कधी धर्मांदानी कधी जाती व माती वाल्यानी माणूस मारला कधी आईच्या पोटातच कधी बाहेर आल्यावर बलात्कार करून माणूस मारला कधी संपत्ती साठी कधी सत्ते साठी माणूस मारला कधी पैशासाठी कधी न्याय निवाड्या साठी देश रक्षण , धर्म रक्षण अशी बरीच कारण आहेत माणूस मारण्याची माणूस मारला जातोय कधी RTI च्या चौकशी साठी कधी अंधश्रद्धेची दुकानदारी बंद केली म्हणून कधी दहशतवादाचा खरा चेहरा उघड केला जातोय म्हणून माणूस मारणं कधीच कठीण नव्हतं आज ही नाही फक्त एकच वाइट वाटत कधी कधी माणुसकीहि संपत चालली आहे या अशा वागण्यामुळे माणुसकी साठी तरी माणूस जगवा एवढीच अपेक्षा आहे

25 likes 31 shares
WhatsApp