करियर ------------ फॉरेंसीक सायन्स ( Forensic science or Criminology) सोनी टिव्ही वरील लोकप्रिय मालिका CID मधिल अनेक पात्र घराघरात लोकप्रिय झाले आहेत। यात डॉ साळुंके ,हे फॉरेंसीक एक्सपर्ट दाखवले आहेत। डॉ साळुंके मुळेच पोलिसांना गुन्हा ऊकलण्यास, गुन्हा साबीत करण्यास फॉरेंसीक सायन्स ची मोठी मदत मिळते। या मालिके मुळे अनेक तरुणांना या क्षेत्राचा ओढा वाटु लागला आहे। नेमक काय आहे या क्षेत्रात? याच शिक्षण कुठे मिळेल? फॉरेंसीक सायन्स ही गुन्ह्याचा तपास करण्या साठीची सर्वात अत्याधुनिक व प्रगत अशी शास्त्रशुद्ध पद्धत आहे। घटनास्थळी व ईतर ठिकाणच्या मिळालेले धागेदोरे याचे कायदेशीर पुराव्यात रुपांतर करणे हे मुख्य काम आहे। हे काम challenging and interesting आहे। ढोबळ स्वरुपात याचे तीन भाग असतात। 1) Crime medical 2) Laboratory 3) Field science मेडिकल मधे pathology, psychiatry, Psychology, Forensic medicine, Dentistry ईत्यादि विषय येतात। Laboratory मधे Chemistry, Biology, Toxicology, Ballistic, Finger prints, Other impression. ईत्यादि विषय येतात। Field science मधे घटनास्थळ, आगीचे ठिकाण, स्फोटाचे ठिकाण, ईत्यादि विषयाचा अंतर्भाव होतो। यावरुन एक गोष्ट लक्षात येते कि टिव्ही सिरीयल मधे दाखवल्या प्रमाणे forensic science / criminology हे एका व्यक्ति चे काम नसते। या करिता विवीध क्षेत्रातील तज्ञांची टिम काम करत असते। याच्या शिक्षणात विवीध प्रकारच्या कोर्स चा अंतर्भाव होतो। १० वी, १२वी, Bsc, BA ,MBBS नंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळु शकतो। काही कोर्सेसची नावे पुढिल प्रमाणे... Bsc in forensic science, Certificate course in forensic science expert, Diploma in criminology, MD in forensic science MSC in criminology, Diploma in finger print examination. अशा काही कोर्स चा समावेश होतो । काही संस्था....... सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे। सेंट झेवीयर कॉलेज, मुंबई । Government Institute of Forensic science, Aurangabad and Nagpur. Dr. B R Ambedkar medical college , Bangalore. Kurukshetra University , Kurukshetra (Haryana) Sri Aurobindo Institute of medical science, Indore. यासह आणखीन काही संस्था आहेत। ज्या युवक ,युवतींना गहन विचार करायची सवय आहे, व नवीन क्षेत्राची आवड आहे अशांनी या क्षेत्राचा जरुर विचार करावा।
K
Kunal Mishra
Social · Marathi · Social_Awareness
103 likes
55 shares