Back to feed
K
Kunal Yadav Social · Marathi · Social_Awareness

खाजगी शाळांची वाढती संख्या आणि त्यामुळे वाढलेली स्पर्धा . त्यामुळे संस्थाचालक काहीतरी वेगळे आणि नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरून पालकवर्ग आपल्या शाळांकडे आकर्षित होईल. याचाच एक भाग म्हणून आजकाल जवळ जवळ प्रत्येक खाजगी शाळांमधून ज्या त्या सणाचे औचित्य साधून तो उत्सव शाळांमधून साजरा करण्याची प्रथाच चालू झाली आहे. या संकल्पनेतून काही शाळांमधून आषाढी एकादशीला बाल वारकर्यांची दिंडी, कृष्णजन्माष्टमी, दहीहंडी , नौरात्र महोत्सव ,गणपती बसवणे, दिवाळी उत्सव , ख्रिस्मस इ. उत्सव साजरे केले जातात. "सर्व धर्म समभाव" ,या विचारधारेतून विचार केला गेला तर आज शाळांमधून प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख इ. धर्मातील विधार्थी विध्यार्जन करीत असतात. आता वरील सणांची यादी बघितली तर काय लक्षात येते ? असे केल्याने शाळांमधून एखाद्याच धर्माचा प्रचार होतो अथवा धार्मिक वातावरण तयार होते . हे सण आपापल्या घरातून प्रत्येकजन साजरा करीत असतो. त्याला सार्वत्रिकपणे साजरा करण्याची आवश्यकता नाही. असले प्रकार करण्याएवजी शाळांमधून फक्त राष्ट्रीय सणच साजरे केले जावेत. आपल्याकडे देशप्रेम फक्त 15 आगष्ट आणि 26 जानेवारीला जागृत होते. नाहीतर धर्मप्रेमच ओसंडून वाहत असते !! आजची शिक्षण पद्धती आणि सभोवतीचे वातावरण हे देशभक्ती वाढवण्यापेक्षा "देवभक्तिच" वाढवणारे आहे. समाजसुधारकांची जयंती आणि स्मृतीदिनी त्यांच्या कार्यावर नाट्य आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. धार्मिक वातावरणनिर्मिती न करता राष्ट्रीय वातावरण निर्मिती केली गेली पाहिजे. वैज्ञानिक प्रयोग सदर केले गेले पाहिजेत. उत्सवांमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान तसेच प्रदूषण याबद्दल प्रबोधन केले गेले पाहिजे. पर्यावरणाबाबत जागरुकता ,सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत जागरुकता, झाडांची निगा आणि त्याचे महत्व ,कचर्याचे व्यवस्थापन, प्लास्टिकवापराबाबत जागरुकता, तसेच अशा activity मधून भाग घेणाऱ्या आणि त्याचे अनुकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेकडून प्रोहोत्सानपर ग्रेड, स्टार दिले जावेत. आम्ही शाळेत असताना विद्धेची देवी सरस्वती म्हणून सरस्वती पूजा वर्गणी काढून एक एक वर्गातून महिन्याला केली जायची. ज्या देशात स्त्रीशिक्षणाला बंदी होती त्या देशात विद्देची देवता देवी ? आणि ज्या सावित्रीबाई फुलेंनी कशाचीही पर्वा न करता शिव्या-शाप, दगड-धोंडे ,शेणाचे गोळे यांचा वाऱ सहन केला पण स्त्रीशिक्षणाचे कार्य सोडले नाही ,तिचे कार्य मात्र फक्त इतिहासाच्या पुस्तकात चार ते पाच ओळी आणि एका मार्कापुरते मर्यादित राहते. आज गरज आहे शाळांमधून विद्देची देवी म्हणून सावित्रीबाई फुलेंचे स्मरण करण्याची. शाळांमधून राष्ट्रीय एकात्मता तयार करण्यावर लक्ष दिले गेले पाहिजे. धार्मिक वातावरणनिर्मिती होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. कारण या शाळांमधून भावी नागरिक घडत असतात. देशाचे हे भावी नागरिक आहेत. त्यांच्या मनात देशप्रेमाचेच रोपटे लावा. तरच उद्याचा प्रत्येक नागरिक हा भारतीय बनेल. आपण प्रथम आणि शेवटी भारतीय आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे. जय भारत.

220 likes 84 shares
WhatsApp