Back to feed
M
Myra Yadav Social · Marathi · Social_Awareness

खरच सांगा गुरुजी =========================== खरच सांगा गुरुजी.कोण कुठं चुकलं?🤔 शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं?🤔 काॅप्या पुरवुन शाळेचं काम तुम्ही खास केलं , दहावीचं पोर माझं झटक्यात पास केलं ! पोरासगट माझा सत्कार जाहिर झाला. सत्काराचा माझ्या गाजावाजा गावभर झाला ! माझ्यासह संस्थेचं, नाव त्यानं राखलं खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं?🤔 टक्केवारी वाढवुन पगार तुमची वाढली, पगाराची नशा🍷🍻🍾 दारुसारखी चढली ! अाता पोरगं अाकरावीत भुगोल, गणित पचेना . इंग्रजीतर सोडाच मराठीही वाचेना ! परिक्षेच्या भट्टीत ,कच्चं अांम्बं पिकलं खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं?🤔 आता गच्ची कोणाची धरू अाकरावीतुन बारावीत तसच तुम्ही रेटलं, फॅशनचे कपडे घालुनफेर अॅन्ड लवली नटावणी नटलं ! बारावीच्या नखर्‍याला खुदकन हसलं,😊 चार विषयात पोरगं गळ्याइतकं फसलं ! मायेनं पदराखाली,अाम्ही त्याला झाकलं खरच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं?🤔 शाळंसाठी पोराच्यासाठी नवं साल धरलं. विकु म्हणते अाई त्याची गळ्यातिल डोरलं ! शाळा शिकुन पोरगं लय लय मोठं होईल, अाईच्या सपनाला सुखाचं फुल येईल ! गैरहजेरीची तुम्हि का नाही कळवली?, सुखाचं सपान , डोळ्यातच सुकलं खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं?? शाळंला पोरानं राम राम ठोकला, पुस्तकाचा डिगारा किलोवर विकला ! अाता पोरगं हॉटेलात काम करु लागलं, खंगलेल्या संसाराला धिर देवु लागलं ! पण घात कुणी केला? अायुष्याच्या प्रवासात कोण काय शिकलं खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं??? शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं? शिक्षणाचि वाट तुम्ही लावली पहिले पोर म्हणायचे वाट तुम्ही दावली _______________________ आजच्या आठवी पर्यंन्त पुढच्या वर्गात ढकलणे व नंतर पुढे मुलांची कशी परवड होऊन नुकसान होत? हे विशद करणारी सुंदर कवीता .🌹👌🏻🙏🏻

169 likes 22 shares
WhatsApp