Back to feed
K
Krishna Kapoor Social · Marathi · Social_Awareness

*खरच सांगा गुरुजी* ========================= *खरच सांगा गुरुजी.* कोण कुठं चुकलं *शाळेमध्ये पोरगं* नेमकं काय शिकलं *काॅप्या* पुरवुन *शाळेचं* काम तुम्ही खास केलं, *दहावीचं पोर* माझं झटक्यात *पास* केलं ! पोरासगट माझा *सत्कार जाहिर* झाला. *सत्काराचा* माझ्या *गाजावाजा* *गावभर* झाला ! *माझ्यासह संस्थेचं, नाव* त्यानं राखलं *खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं* *टक्केवारी* वाढवुन *पगार* तुमची *वाढली,* *पगाराची नशा* दारुसारखी *चढली !* अाता पोरगं अाकरावीत *भुगोल गणित* पचेना . *इंग्रजी*तर सोडाच *मराठीही* वाचेना ! *परिक्षेच्या* भट्टीत, कच्चं *अांम्बं* पिकलं *खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं* *अाकरावीतुन बारावीत* तसच तुम्ही *रेटलं,* *फॅशनचे कपडे* घालुन नटावणी नटलं ! *बारावीच्या* नखर्‍याला खुदकन हसलं, *चार विषयात* पोरगं गळ्याइतकं *फसलं !* *मायेनं पदराखाली,* अाम्ही त्याला झाकलं *खरच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं* शाळंसाठी पोराच्या नवं साल धरलं. विकु म्हणते *अाई* त्याची *गळ्यातिल डोरलं !* शाळा शिकुन पोरगं लय लय मोठं होईल, *अाईच्या सपनाला* *सुखाचं फुल* येईल ! सुखाचं सपान, डोळ्यातच सुकलं *खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं* *शाळंला पोरानं* राम राम ठोकला, *पुस्तकाचा* डिगारा किलोवर *विकला !* अाता *पोरगं हॅाटेलात* काम करु लागलं, *खंगलेल्या संसाराला* धिर देवु लागलं ! अायुष्याच्या प्रवासात कोण काय शिकलं *खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं* *शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं* _______________________ आजच्या *आठवी* पर्यंन्त *पुढच्या वर्गात ढकलणे* व नंतर पुढे मुलांची कशी परवड होऊन नुकसान होत हे विशद करणारी शिक्षण व्यवस्थेतील उणीव दर्शविनारी *सुंदर कविता.*

247 likes 74 shares
WhatsApp