Back to feed
N
Nisha Verma Social · Marathi · Social_Awareness

गौराई च्या स्फूर्तीने बहरून आलेलं हे स्तुतिपर काव्य.. सर्वांना नवरात्री च्या शुभेच्छा!!! --------------------------------- जगत्माता हे गौरी कैलास वाशिणी साक्षात अन्नपूर्णा तू सृष्टी सुहासिनी सगुण रूप होऊनि सदनी अवतरलीस निर्गुणातीत सारी शक्ती तुझियात गुंफलीस चेहऱ्यावरील तेज तुझे सहस्त्र सुर्यांचे डोळ्यांतील माया तुझी शीतल चांदण्यांचे मुखावरील स्मित हास्य जगण्याची स्फूर्ती गौरवर्णी हि काया ममतेची मुर्ती नटण्याचा थाट तुझा विश्वरूप सौन्दर्य अंगावरील द्रव्य दागिणे संपन्न ऎश्वर्य पुत्र श्री गणेश विद्येची देवता सर्व गुणांची जननी सकलकलांची माता आदिमाया हे स्त्री शक्ती एक मागणे दे हरेक नारीत तुलाच पाहण्याची आम्हांस बुद्धी दे..

171 likes 31 shares
WhatsApp